Lord Buddha: मृत मुलाला जिवंत करण्याची महिलेची इच्छा, भगवान बुद्धांच्या शब्दांतून समजलं, वाचा ही रंजक कहाणी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Lord Buddha: मृत मुलाला जिवंत करण्याची महिलेची इच्छा, भगवान बुद्धांच्या शब्दांतून समजलं, वाचा ही रंजक कहाणी

Lord Buddha: मृत मुलाला जिवंत करण्याची महिलेची इच्छा, भगवान बुद्धांच्या शब्दांतून समजलं, वाचा ही रंजक कहाणी

Feb 05, 2025 02:49 PM IST

Lord Buddha: भगवान बुद्धांच्या काळात किसा गौतमी नावाच्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा मरण पावला. दु:खाने त्रस्त होऊन ती मुलाला जिवंत करण्यासाठी भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे गेली. त्यानंतर काय झाले जाणून घ्या.

मृत मुलाला जिवंत करण्याची महिलेची इच्छा, भगवान बुद्धांच्या शब्दांतून समजलं, वाचा ही रंजक कहाणी
मृत मुलाला जिवंत करण्याची महिलेची इच्छा, भगवान बुद्धांच्या शब्दांतून समजलं, वाचा ही रंजक कहाणी

Lord Buddha and Kisa Gautami: भगवान बुद्धांच्या काळात किसा गौतमी नावाच्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा मरण पावला. दु:खाने व्याकूळ झालेली किसा गौतमी आपल्या मृत मुलाला जिवंत करण्याच्या हेतूने घरोघरी फिरून औषध मागत होती. कोणीतरी त्यांना सांगितले की, भगवान बुद्धांकडे असे औषध आहे. त्या औषधाने तुझा मुलगा जिवंत होऊ शकतो.

किसा गौतमी बुद्धाजवळ गेली. त्यांना प्रणाम करून विचारले, 'माझ्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करणारे औषध सुचवू शकाल का?'

'मला अशा औषधाची माहिती आहे.' बुद्ध म्हणाले. पण त्यासाठी मला काही गोष्टींची गरज भासणार आहे. "

"आपल्याला काय हवंय?" तिने सुटकेचा नि:श्वास टाकत विचारलं.

'मला मूठभर मोहरी हवी आहे.' बुद्ध म्हणाले.

त्या स्त्रीने बुद्धांना मोहरीचे दाणे आणण्याचे वचन दिले, पण निघताच बुद्ध म्हणाले, 'ज्या घरात मूल, पती, पत्नी, आई-वडील किंवा नोकर यांचा मृत्यू झालेला नाही, त्याच घरातून मोहरी आणा.'

किसा गौतमीने होकार दिला आणि ती निघाली. ती घरोघरी फिरून मोहरीचे दाणे शोधत होती. प्रत्येक घरात लोक तिला दाणे द्यायला तयार असायचे, पण त्या घरात कोणी मेले आहे का, असे विचारले असता तिला होय असे उत्तर मिळायचेय तिच्या लक्षात आले की, असे कोणतेही घर नाही जिथे कधीही कुणाचा मृत्यू झाला नाही. कुठे मुलगी, कुठे नोकर, कुठे नवरा, कुठे वडील मरण पावले होते. किसा गौतमीला असे एकही घर सापडले नाही जिथे कधीही मृत्यू झाला नसेल. या दु:खात ती एकटी नाही हे पाहून तिने आपल्या मृत मुलाच्या देहाची आसक्ती सोडून बुद्धाकडे परतली. तेव्हा बुद्ध अतिशय दयाळूपणे म्हणाले, 'तुला वाटले की फक्त तुझा मुलगाच मरण पावला आहे. मृत्यूचा नियम असा आहे की, प्राण्यांमध्ये कोणीही शाश्वत नाही.

किसा गौतमीच्या शोधाने तिला शिकवले की, मनुष्य दु:ख आणि दु:खापासून मुक्त नसतो. या भयंकर दु:खाला सामोरे जाणारी ती एकटी नव्हती. ही अनुभूती अपरिहार्य दु:ख दूर करत नाही, तर जीवनातील या कटू वास्तवाशी लढल्यामुळे होणारे दु:ख कमी करते.

दु:ख केवळ तात्पुरते टाळता येते. पण ज्या आजारावर उपचार केले गेला नाहीत (किंवा औषधांनी वरवर उपचार केले जातात, जेणेकरून त्याची लक्षणे दडपली जातात पण खरा आजार बरा होत नाही) तर तो रोग वाढत जातो. औषधे तात्पुरता आराम देऊ शकतात, परंतु त्यांच्या सततच्या वापरामुळे शरीराला होणारे शारीरिक नुकसान आणि त्यातून आपल्या जीवनाचे होणारे सामाजिक नुकसान यांनी अधिकच्या वेदना होऊ शकतात. वेदना नाकारणे किंवा दडपून टाकणे आपल्याला तात्पुरते ते सहन करण्यापासून वाचवू शकते, परंतु यामुळे ते दूर होत नाही.

Whats_app_banner