पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याचा 'हा' तरुण घालतो दिवसाला ५ किलो सोनं

प्रशांत सपकाळ

जेव्हा आपण संगीत दिग्दर्शक बप्पी लहरींचं नाव घेतो तेव्हा आपल्याला त्यांच्या सोन्यावरील प्रेमाची आठवण होतेच. बप्पी लाहिरींच्या याच गोष्टीवर प्रेरीत होऊन पुण्याच्या एका तरुणानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं ठवरलं. पुण्याचा व्यावसायिक प्रशांत सपकाळ यानं लहानपणी जेव्हा बप्पी लाहिरींना पाहिलं होतं, तेव्हाच त्यानं ठरवलं की, मोठं होऊन बप्पी लहरींपेक्षा जास्त सोनं घालायचं. प्रशांतचं हेच लहानपणीचं स्वप्न खरं झालंय. प्रशांत वेगवेगळ्या प्रकारचे ५ किलो सोन्याचे दागिने दिवसाला अंगावर मिरवतो. या दागिन्यांची किंमत तब्बल दीड कोटी आहे.

चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले 

प्रशांतच्या गळ्यामध्ये जाड आणि मोठ्या वजनाची सोन्याची साखळी आहे. या साखळीमध्ये त्याच्या नावातील आद्यक्षराचा म्हणजे 'पी' चा पेन्डंट आहे.  हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना प्रशांतनं असे सांगितले की, या सगळ्या दागिन्यांमध्ये प्रशांतला त्याच्या साखळीमध्ये असलेला पी चा पेन्डंट सगळ्यात प्रिय आहे.  

पीक विमा योजनेतील तक्रारी सोडवण्यासाठी समितीची स्थापना

सोन्याच्या साखळीसोबत प्रशांतने हातामध्ये घातलेले ब्रेसलेट आणि कडा हा देखील सोन्याचा आहे. त्यावर सुंदर नक्षिकाम केले आहे. त्याचसोबत प्रशांतकडे आयफोन असून या आयफोनचं कव्हर देखील सोन्यापासून तयार केलं आहे. तर प्रशांतचे शूज देखील सोन्याचे असून त्यावर देखील सुंदर नक्षिकाम करण्यात आले आहे.