पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-सातारा महामार्गावर अपघात, एअर बॅगमुळे चालक बचावला!

वारजे-माळवाडी उड्डाणपूलावर भीषण अपघात

पुणे सातारा महामार्गावरील वारजे-माळवाडी उड्डाणपूलावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात अजिंक्य राऊत (२०) हा सिंहगड महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी जखमी झाला आहे. अजिंक्यचे वडील रांजणगाव पोलिस ठाण्याचे इनचार्ज आहेत. अजिंक्य कारमधून कात्रजच्या दिशेने जात होता.     

डेक्कन क्वीनचा चेहरा-मोहरा बदलणार!

हा अपघात इतका भीषण होता की, दोन ट्रकच्या मध्ये कारचा अक्षरश: चक्काचूरा झाला. याप्रकरणात विनोद मुंडे नावाच्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. वारजे-माळवाडी पोलिस स्थानकात याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त पद्मनाभन यांची बदली

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या पाठोपाठ असलेल्या कारला मागच्या बाजूने वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली.  घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी अजिंक्यला गाडीबाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. एअर बॅगमुळे त्याचा जीव वाचला, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Youth miraculously survives after being crushed between two trucks on Pune Satara highway