पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः पीएमपीच्या बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणेः पीएमपीच्या बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पीएमपीएमएलच्या बसखाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. आकाश तुकाराम विधाते (२४, रा. विधाते वस्ती, बाणेर) असे मृत युवकाचे नाव आहे. टिळक रस्त्यावर हा अपघात घडला.

अंत्यविधीला निघालेल्यांवर काळाचा घाला, कार विहिरीत कोसळून ५ जण ठार

अधिक माहिती अशी, आकाश विधाते हा अलका टॉकीजकडून स्वारगेटच्या दिशेने भरधाव निघाला होता. टिळक रस्त्यावर आला असता अचानक रिक्षा मध्ये आल्याने आकाशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट समोरुन येणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या पुढच्या चाकाखाली आला. यात त्याचा मृत्यू झाला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. 

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; डंपर-क्रूझरच्या धडकेत १० ठार