पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाळेत मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू

मारहाण (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यातील चाकण परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. शाळेत मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आकाश बाबूराव शेलार (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून एक जण पसार झाला आहे. 

पुणेः आठ वर्षांच्या मुलीचा खून करुन पित्याची आत्महत्या

चाकण येथील अमृतनगर परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या एका मुलीची आकाशने छेड काढल्यावरून संशयित आरोपींनी त्याला ४ ऑगस्ट रोजी पकडले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी अमित ऊर्फ अण्णा बजरंग माने, सागर विटकर, पद्माकर चितलेवाड, गणपत लेहार, आकाश दौंडकर, संदीप किसन कुसाळकर (सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सोन्या तामळगे हा पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

जळगावः यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून छापल्या १००च्या नोटा