पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गॅस गिझरमधील वायू गळतीमुळे पुण्यात तरुणाचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

गॅस गिझरमुळे मृत्यू झाल्याच्या अनेत घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यातील कोथरुडमध्ये गॅस गिझरमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गॅस गिझरमधून वायू गळती झाल्यामुळे ३० वर्षाच्या रामराजे संकपाळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूचूी नोंद करण्यात आली आहे.

'फडणवीस दिल्लीत गेले तर आनंद, महाराष्ट्राला चांगला उपयोग होईल' 

कोथरुड परिसरात असलेल्या एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. रामराजे नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी गेला होता. गॅस गिझरमधून होत असलेल्या वायू गळतीमुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळापासून तो बाथरुममधून बाहेर न आल्यामुळे शेवटी अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बाथरुमचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. 

'देशविघातक कृत्यांचा आरोप असलेले PFIचे नेते आप, काँग्रेसच्या संपर्कात'

याआधी, मुंबईमध्ये देखील अशीच घटना घडली होती. गॅस गिझरमुळे बोरीवलीतील दहावीमध्ये शिकणाऱ्या ध्रुवी गोहीलचा मृत्यू झाला होता. ध्रवी सकाळी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. बराच वेळ झाला ती बाहेर न आल्यामुळे बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा ध्रुवी बेशुध्दावस्थेत पडली होती. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले होते. गॅस गिझरमधून वायू गळती झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला होता. 

लोकसभेतील नरेंद्र मोदींच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे...