पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. पुणे जिल्ह्याला सुध्दा अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका तरुणाने नापिकी आणि कुटुंबावर असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. 

दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट आणि...

पुण्यातील खेड तालुक्यातील किवळे गावात ही घटना घडली आहे. धनंजय बाळू मस्के (१९ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. धनंजयने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. धनंजय मस्के याच्या कुटुंबियांकडे तुटपुंजी शेती होती. तसंच त्याच्या कुटुंबियांनी शेतीसाठी कर्ज देखील काढले होते. 

नेहरू स्मारक सोसायटीतून काँग्रेस नेते 'आऊट', अमित शहा 'इन'

कर्ज काढून शेती केली मात्र शेतामध्ये दुष्काळामुळे काहीच पिकत नव्हते. शेतीला कोणताही जोडव्यवसाय नसल्याने मस्के कुटुंबावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. तसंच कुटुंबाला हातभार लागावा म्हणून धनंजय शिकून नोकरी सुध्दा करत होता. मात्र सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणाला कंटाळून धनंजयने आपले जीवन संपवले आहे. 

ठरल्याप्रमाणे करा एवढाच प्रस्ताव - संजय राऊत