पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः १३ तासांत शहराला महिनाभर पाणी पुरेल इतका पाऊस

खडकवासला धरण

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील १३ तासात सव्वा टीएमसी एवढा पाऊस पडला आहे. शहराला महिन्याला सव्वा टीएमसी एवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब मानली जात आहे.

दगदगीचा मुंबई-पुणे प्रवास पावसामुळे धाकधुकीचा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणात ७६ मिमी, पानशेत १४७ मिमी, टेमघर १७० आणि वरसगाव १४५ मिमी असा पाऊस मागील १३ तासात धरण क्षेत्रात पडला आहे. तर सद्यस्थितीला चारही धरणात मिळून १६.७४ टीएमसी आणि ५७.४३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आकडेवारीवरून मागील १३ तासात सव्वा टीएमसी एवढा पाणीसाठा धरण क्षेत्रात जमा झाला आहे. यामुळे पुणेकर नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे.

पुण्यातील झेड ब्रिजवरील संरक्षक कठडा कोसळला