पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोठ्याप्रमाणात टेस्ट होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे'

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

सध्या आपण मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहोत, त्यामुळे  कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही, परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबविले आहे. अशाप्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

देशव्यापी लॉकडाउनदरम्यान हवेचा दर्जा सुधारला, नासाने शेअर केले फोटो

वाढती रुग्ण संख्या बघून घाबरू नका. यावर आपण निश्चित मात करू असे, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका. पुण्यासाठी हा कठीण काळ आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या. वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.

राज्यातील हॉटेल्स, खानावळींचे किचन्स सुरु करा: राज ठाकरे

सर्दी, ताप, खोकला, थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवावा. आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका. वेळेवर उपचार मिळाले, तर रुग्ण बरे होतात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खूशखबरः ७८ जिल्ह्यात १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही

पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. भाजीपाला देखील काही दिवस नागरिकांना मिळणार नाही. तसेच उद्योजकांनी कामगारांची व्यवस्था तेथेच करावी. त्यांना अजिबात बाहेर जाता येणार नाही. त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात आतापर्यंत ५ लाखांहून कोरोना टेस्ट, २१७९७ जणांना लागण

शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली. बिनधास्त राहू नका. काळजी घ्या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:we doing more test therefore coronavirus affected patient numbers increases says collector naval kishor ram