पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात खडकवासला धरणातील विसर्ग कमी

खडकवासला धरण

पुण्यामध्ये गुरुवारी पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्गही कमी झाला आहे. खडकवासला धरणातून होणारा विसर्ग गुरुवारी संध्याकाळी ९४१६ क्युसेक्स पर्यंत कमी करण्यात आला. हाच विसर्ग बुधवारी रात्री ४१ हजार क्युसेक्स होता. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर धरणात येणारे पाणी कमी होऊ लागल्यावर टप्याटप्याने विसर्गही कमी करण्यात आला. 

सांगलीतील पूरस्थिती जैसे थे, नौदलाची १२ पथके बचावकार्यासाठी रवाना

खडकवासला धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्यामुळे मुठा नदीपात्रातील पाणी पातळीही कमी झाल्याचे शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. गुरुवारी पाण्याखाली असलेला डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल शुक्रवारी सकाळी दिसू लागला आहे, असे स्थानिकांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी बाबा भिडे पूलाखालून पाणी वाहात होते. 

मध्य, पश्चिम रेल्वे लाईफ जॅकेट्स, बोटी खरेदी करणार; कशासाठी माहितीये?

खडकवासला धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी सहापर्यंत दोन मिलीमीटर पाऊस पडला होता. वरसगाव आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३ मिलीमीटर तर टेमघरमध्ये ४५ मिलीमीटर पाऊस पडला.