पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात खडकवासला धरणातील विसर्ग वाढविला

खडकवासला धरण

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बुधवारी रात्री वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खडकवासला धरणातून बुधवारी रात्रीपासून मुठा नदीपात्रात ४१,६२४ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

खडकवासलाच्या वर असलेली पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे या धरणात येणारे पाणी सोडावे लागते आहे. सध्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धऱणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवावा लागला आहे. 

खडकवासला धरणातून बुधवारी संध्याकाळी ३५५७४ क्सुसेक्सने पाणी सोडण्यात येत होते. त्यामध्ये रात्री वाढ करण्यात आली असून, आता ४१,६२४ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.