पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलमट्टीतून विसर्ग आणखी वाढविला...

आलमट्टी धरणातून विसर्ग झाल्यामुळे विजापूर ते होस्पेट आलेले पाणी.

आलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून १४०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून ४८ हजार ८९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी सोमवारी सकाळी दिली.

पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही?- अमेय खोपकर

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी सात वाजता ४९ फूट असून, एकूण ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ३.२७ टीएमसी, वारणा ३२.४६ टीएमसी, दूधगंगा २४.१४ टीएमसी, कासारी २.६६ टीएमसी, कडवी २.५२ टीएमसी, कुंभी २.५३ टीएमसी, पाटगाव ३.७२ टीएमसी, चिकोत्रा १.३९, चित्री १.८८ टीएमसी, जंगमहट्टी १.२२ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी असा आहे.

Jio GigaFiber ग्राहकांना 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहता येणार

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ४९ फूट, सुर्वे ४६.११ फूट, रुई ७७.९ फूट, इचलकरंजी ७६ फूट, तेरवाड ८०.१० फूट, शिरोळ ७६.७ फूट, नृसिंहवाडी ७६.७ फूट, राजापूर ६२.१ फूट तर नजीकच्या सांगली ५१.२ फूट आणि अंकली ५६.९ फूट अशी आहे.