पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित आघाडी संघ स्वयंसेवकांच्या हाती, लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप

प्रकार आंबेडकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण माने

विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकरांवरुन प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे. वंचित आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपसाठी खुला करुन दिल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितचे महासचिव पडळकर हे भाजप आणि संघाशी संबंधित होते. सरचिटणीस ए आर अजेरिया हेही भाजपशी संबंधित होते. त्यांना पदे देण्यात आली. खरा वंचित बाजूला राहिला आणि संघाच्या हस्तकांनी वंचित आघाडीत प्रमुख पदे दिल्याचा आरोप त्यांनी केला. वंचित आघाडी ही आता वंचितांची नव्हे तर उच्चवर्णियांची झाली आहे, असेही माने यांनी म्हटले. दरम्यान, पडळकरांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असून ते ज्याप्रमाणे सांगतील, तसे बोलतात असा प्रत्यारोप केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत 'वंचित'ला बरोबर घेण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत खलबतं

लक्ष्मण माने हे 'एबीपी माझा'शी बोलत होते. ते म्हणाले, पडळकरांचे संघाच्या वेशातील, संभाजी भिडे गुरुजींच्या पाया पडतानाचे फोटो फिरतात. आक्षेप घेऊनही त्यांना महासचिव करण्यात आले. माझ्या परस्पर अनेकांना प्रवक्ते केले. मी कट्टर आंबेडकरवादी आहे. आमच्या वर्तणुकीमुळे भाजपला फायदा झाला आहे, हे सत्य आहे. आम्हाला बी टीम म्हणत असतील तर एवढा राग का येतो, असा सवाल त्यांनी केला. आंबेडकरांना आम्ही सर्वांनी अध्यक्ष केले आहे. त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी सर्व पदाचा राजीनामा दिला पाहिजे. माझे आता स्वतंत्र अस्तित्व आहे. पक्षाच्या संसदीय सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्यामागे वंचित आघाडी आहे, असा दावाही त्यांनी केला. 

विधानसभेच्या सर्व २८८ जागा वंचित आघाडी लढवणारः प्रकाश आंबेडकर

जी चूक लोकसभेवेळी झाली ती आता होता कामा नये. लोकसभेवेळी स्वतंत्र निवडणूक लढायची गरज नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादीच नव्हे तर डाव्या आणि इतर पक्षांशीही आघाडी करायला हवी होती. वंचित आघाडीमुळे भाजपला १० जागा जास्त गेल्या. माझ्या हातून झालेली ही अक्षम्य चूक आहे. माझ्यामुळे भाजपसारख्या पक्षाला जागा गेल्या आहेत.