पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या सरकारच्या सूचना

फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना क

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून  फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

कोरोनामुक्त होणारं गोवा पहिलं राज्य, सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

त्यानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

यू-टर्न !, ई-कॉमर्स कंपन्यांकडून फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच विक्री

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
'त्या' निर्लज्ज राज्यपालांची आठवण झाली, संजय राऊत यांचा निशाणा