पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्पनेपलीकडचा पुणेरी पाऊस! रात्रीच्या थैमानाचा अंदाजच नव्हता

पुण्यात तुफान पाऊस आंबील ओढ्यामुळे अनेकांवर ओढावली नामुष्की

पुण्यात बुधवारी रात्री मूसळधार पाऊस झाला. पुढील चार ते पाच दिवसांत असाच पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्री झालेल्या पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही तासांत एक ओढा आणि काही नाल्यांतील पाण्याने पुण्यातील काही भाग जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक इमारतीमध्ये पाणी शिरले. यात सर्वाधिक नुकसान चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे झाले. शहरात सर्वत्रच पाऊस पडत होता मात्र, पुण्याच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाने काहीभागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. अनेकांना साखर झोपेतून जाग आल्यानंतर पावसाची भीषण तीव्रता समजली.

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कामाच्या निमित्ताने आलेल्या कर्मचाऱ्यांना पाऊस पडत असल्याची कल्पना होती. पण हा पाऊस त्यांना कार्यालयातच मुक्काम ठोकायला लावेल, असे कुणाला वाटले नव्हते. मुंबईकर पावसात अडकल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. पण कालच्या मुसळधार पावसाने पुण्याची तुम्बापूरी झाल्याने अनेकांना घराबाहेर मुक्काम ठोकावा लागला.   

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आंबील ओढ्याने आढावलेली ही परिस्थिती भीषण अशीच होती. कात्रज तलावापासून आंबील ओढ्याची सुरुवात होते. पेशव्यांच्या काळात आंबील ओढाही पुण्याच्या पश्चिमेकडील सीमा मानली जायची. या ओढ्याच्या काठी कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर आहेत. या सर्व भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला मिळतो. 

पुण्यात पावसाने घेतला ११ जणांचा बळी; चौघे बेपत्ता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: unbelievable heavy rain in pune Ambil Odha overflow may be record new history of Ranfall