पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात PM मोदींचं CM ठाकरेंकडून स्वागत तेही फडणवीसांच्या उपस्थितीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींचे स्वागत केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील लोहगाव विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले. राजशिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  मोदींचे  स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी हे देखील उपस्थित होते. 

हैदराबाद एन्काऊंटरवर राज ठाकरे म्हणाले की,...

शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षानंतरची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. पुण्यातील हा कार्यक्रम राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच नियोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पुण्यात होणार हे ठरल्यानंतर मोदींच्या स्वागत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील आणि माजी मुख्यमंत्र्यांवर हा प्रसंग पाहण्याची वेळ येईल, अशी कल्पानाही  कुणी केली नसेल. पण हाच प्रकार पुण्यातील लोहगाव विमानतळावर पाहायला मिळाला.  

बंदूक हिसकावून आरोपीने पहिली गोळी झाडली : पोलीस आयुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पोलीस महासंचालक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ६.४५ वाजेपर्यंत पंतप्रधान योग शिबिरात भाग घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा पुण्यात आहेत.