पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी ते पोहचले आहेत. शरद पवारांकडून उदयनराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे हे देखील त्याठिकाणी उपस्थित आहेत. 

बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईत ५० हजार पोलिस तैनात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरु आहे. एकापाठोपाठ एक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकत असल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सोयी-सुविधांनी सज्ज

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये तब्बल दीड तास वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मात्र उदयनराजे भोसले यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य न केल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश बारगळला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी झालेल्या भाजपच्या तिसऱ्या मेगा भरतीवेळी भाजप पक्ष प्रवेश केला नसल्याचे सांगितले जात आहे. 

साताऱ्यात ट्रक-बसचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू २० जखमी