पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघींचा धरणात बुडून मृत्यू

चिमुकलीचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दोन महिलांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंबोली गावातील दोन महिला कपडे धुण्यासाठी उच्छिल धरणावर गेल्या होत्या. कपडे धुवताना पाय घसरुन धरणात पडून या महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आंबोली गावात शोककळा पसरली आहे. 

COVID -19: वरळी आणि धारावीत ड्रोनद्वारे पोलिस देणार सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे. अशात जुन्नर परिसरातील आदिवासी दुर्गम भागात लॉकडाऊनच्या काळात घरगुती कामे करण्यासाठी बाहेर पडत आहे. आंबोली गावातील दोन महिला गावाजवळ असणाऱ्या धरणावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. ज्याठिकाणी त्या कपडे धुवत होत्या तो धरणाचा परिसर निसरटा होता. 

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणे 'मुश्किल': अख्तर

कपडे धुताना यामधील एका महिलेचा पाय घसरला आणि ती धरणात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या महिलेचा देखील बुडून मृत्यू झाला. सीता रमेश भालचिम (२९ वर्ष) आणि नावडाबाई कोकाटे (३५ वर्ष) अशी मृत महिलेंची नावं आहेत. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. 

कोरोनाशी लढा : राज ठाकरे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा