पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोघे जण ताब्यात

महाराष्ट्र पोलिस

पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) एका इमारतीमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तरुणीचा खून झाला की तिने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेजसा शामराव पायाळ असे या तरुणीचे नाव आहे. ती २६ वर्षांची एमबीए पदवीधर होती. 

मुंबईत शिवसेनेला धक्का; ४०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बुधवारी सकाळी तिच्या आईला घरामध्ये तिचा मृतदेह आढळला होता. तेजसाच्या शरीरावर विविध जखमा आहेत. त्याचबरोबर तिच्या गळ्याभोवती दाब पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. पण तेजसाने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही. तेजसाच्या घरात मद्याच्या बाटल्याही सापडल्या होत्या. त्या ठिकाणी तिच्या मित्रांनी पार्टी केल्याची माहिती मिळाली आहे. 

... १९८४ ची दंगल टळली असती, मनमोहन सिंग यांचे गंभीर वक्तव्य

तेजसा सिंहगड रस्त्यावर भाड्याने सदनिका घेऊन राहात होती. ती मूळची बीडमधील आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती नोकरीच्या शोधात पुण्यात राहात होती. तिची आईसुद्धा तिच्यासोबत राहायची. पण कौटुंबिक कार्यक्रमासाठी तेजसाची आई बीडला गेली होती. त्यामुळे घटना घडली त्यावेळी ती घरात एकटीच होती. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.