पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काळवीट, हरिणाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले

कारवाई करणारे वन विभागाचे अधिकारी खाली बसलेल्या आरोपींसह.

काळवीट आणि हरीण या वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. दीपक कुलकर्णी आणि गणेश पवार अशी या दोघांची नावे आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल गुरुवारी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

'महाराष्ट्राचे मालक आहोत ही अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक'

वनविभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, पुणे सातारा रस्त्यावर कात्रजमध्ये जुन्या बोगद्याजवळ ही कारवाई करण्यात आली. दीपक कुलकर्णी आणि गणेश पवार यांच्याकडून काळवीट आणि हरीण यांची कातडी जप्त करण्यात आली. त्याचबरोबर कातडीच्या तस्करीसाठी वापरलेली मोटारही वन विभागाने जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर या दोघांनीही सात दिवसांची वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन उपसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मारणे, मुकेश सणस आणि दीपक पवार यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.