पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; मृतांचा आकडा १० वर

कोरोना विषाणू

पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १० वर पोहचला आहे. तर पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५७ झाली आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू

पुण्याचे विभागिय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रुग्णाचा नायडू रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १० वर पोहचला आहे. यामधील एका मृत रुग्णाला मधूमेहाचा त्रास होता आणि तो ४४ वर्षांचा होता. 

कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा; लॉकडाऊनमुळे संसर्ग झाला कमी

दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३६ असून पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ झाली आहे. तर, आतापर्यंत २७ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरातील सील केलेल्या काही भागांत मंगळवारी सांयकाळी ७ वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू राहणार असून  पुणे पोलिसांकडून यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०१८ वर, १५० नव्या रुग्णात भर