पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भोसरीतील लहानग्यांच्या हत्येप्रकरणाला नवे वळण, मुलींवर लैंगिक अत्याचार

घटनास्थळी पोलिस

भोसरीतील तीन लहान मुले आणि एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती हाती आली आहे. मृतांपैकी दोन अल्पवयीन मुलींवर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यापैकी एका मुलीचे वय सात वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय नऊ वर्षे आहे. रविवारी त्यांचे मृतदेह घरातच एका खुंटीला टांगलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यांच्यासोबतच त्यांचा लहान भाऊ आणि आईचा मृतदेहही घरात आढळला होता.

मी अपयशी ठरलो.. मला माफ करा, सिद्धार्थ यांचे भावनिक पत्र

पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर नवी माहिती पुढे आली. दोन्ही लहान मुलींच्या अंगावर अनेक जखमा आहेत. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. अद्याप डॉक्टरांनी याला दुजोरा दिलेला नाही, असे भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले. या प्रकरणात संबंधित मुलींचे वडीलही आरोपी आहेत. त्यांचीही चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने या तिन्ही मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे सुरुवातीला पुढे आले होते. पण तपासामध्ये मुलींच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे आढळून आले होते. वडिलांनी त्या दिवशी, रविवारी सकाळी साडेदहा वाजताच घर सोडल्याचे सांगितले. ते जेव्हा संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी त्यांना घरात चार मृतदेह आढळले. 

...यामुळे त्या दिवशी वांगणीजवळ रेल्वे रुळांवर एवढे पाणी आल्याची शक्यता

वडिलांनीच या मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय होता. संपूर्ण कुटुंब सध्या आर्थिक अडचणीत होते. चारच दिवसांपूर्वी ते भोसरीमध्ये राहण्यासाठी आले होते.