पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वारकरी सांप्रदायावर शोककळा; दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

ब्रेक निकामी झालेला जेसीबी दिंडीत घुसल्याने हा अपघात झाला. दुसऱ्या छायाचित्रात सोपान महाराज नामदास

पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास (वय ३५) यांचा समावेश आहे. अतुल महादेव आळशी (२३) असे दुसऱ्या मृत वारकऱ्याचे नाव आहे. या भीषण अपघातात १६ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा झाला. 

ब्रेक निकामी झालेला जेसीबी दिंडीत घुसल्याने हा अपघात झाला. ही दिंडी पंढरपूरहून आळंदीला जात होती. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला. 

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरवर्षी दिंडीसाठी आम्ही पोलिसांचा बंदोबस्त मागत असतो. मात्र ते प्रत्येक वर्षी आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी आमच्या वारकरी भाविकांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कराडकर यांनी केली. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

१)विष्णू सोपान हळवाल
२)शुभम नंदकिशोर आवरे
३)दीपक अशोक लासुरे
४)गजानन संतोष मानकर
५)वैभव लक्ष्मण बराटे
६)अभय अमृत मोकम्फले
७)किर्तीमन प्रकाश गिरजे
८)आकाश माणिकराव भाटे
९)ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम
१०)गरोबा जडगे
११)विनोद लहासे
१२)नामदेव सागर
१३)सोपान महासाळकर
१४)गजानन सुरेश मानकर
१५)सोपान मासळीकर
१६) दीपक लासुरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:two dead and many injured in accident in dive ghat in pune descendant of saint namdev maharaj sopan maharaj namdas is dead