पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर, आणखी काही निरीक्षणाखाली

कोरोनाच्या संशयितांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना व्हायरसबाधित दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली. या दोन्ही रुग्णांशी जास्तीत जास्त काळ संपर्कात असलेल्या आणखी तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दुबईहून परतताना हे दोन्ही प्रवासी ओला कंपनीची मोटार भाड्याने घेऊन आले होते. त्या गाडीच्या वाहनचालकाचाही शोध घेण्यात आला आहे. त्याच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

पुण्यात सोमवारी रात्री दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. या दोघांनाही नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण गेल्या महिन्यात दुबईला गेले होते. तेथून एक मार्चला ते परत आले. त्यांच्यापैकी एकाला रविवारी त्रास होऊ लागल्याने त्याने नायडू रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर केलेल्या तपासणीत कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

ट्रम्प यांची प्रकृत्ती उत्तम, आरोग्य चाचणी गरजेची नाही- व्हाइट हाऊस

दीपक म्हैसेकर यांनी म्हटले आहे की, पुण्यातील सर्व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची सखोल माहिती घ्यावी. गेल्या काही दिवसांमध्ये कोणी परदेशात गेला होता का, याचाही माहिती घेण्यात यावी. उपचारांपूर्वी या नोंदी अवश्य कराव्यात आणि गरज असल्यास रुग्णाला नायडू रुग्णालयात पाठवावे. नागरिकांनी पुढील काही दिवस प्रवास करणे टाळावे. सार्वजनिक कार्यक्रमात जाणे टाळावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.