पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एल्गार परिषदः पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, एसआयटीकडून चौकशी करा- शरद पवार

शरद पवार (ANI)

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन, त्यांनी सादर केलेल्या कवितांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे चुकीचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कवितेतील दोन ओळींसाठी त्यांना तुरुंगात डांबून ठेवणे चुकीचे आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करुन लोकांना तुरुंगात ढकलले आहे. याची चौकशी करायला हवी. त्यांनी मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. याची चौकशी व्हायला हवी. पुणे पोलिसांचे वागणे अत्यंत आक्षेपार्ह आहे, असे म्हणत सरकारने याप्रकरणी निवृत्त अधिकाऱ्यांची, निवृत्त किंवा विद्यमान न्यायमूर्तींची एसआयटी नेमावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर तत्कालीन सरकारने सत्तेचा गैरवापर केला की नाही याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

कवितेच्या ओळींवरुन काही समाज पेटत नसतो. लोकशाहीत तीव्र भावनाही व्यक्त केल्या जातात. सत्तेचा गैरवापर करुन साहित्यकांवर का करावाई केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

नागरिकत्व कायद्यावरून धार्मिक, सामाजिक सलोखा संपविण्याचा काम - शरद पवार

पुण्याचे पोलिस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. एल्गार परिषदेप्रकरणी कारवाई चुकीच्या पद्धतीने झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि त्यांची चौकशी करावी. पुणे पोलिसांनी सूड भावनेने ही कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला. 

आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवणाऱ्या अमित शहांचं अभिनंदनः राज ठाकरे

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनआरसी) केवळ देशातील अल्पसंख्य समाजाचा विरोध नाही तर विचार करणाऱ्या सगळ्यांचा विरोध आहे, याचा केंद्र सरकारने विचार केला पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली. या कायद्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात दुरावा निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी मनसेचे पहिले अधिवेशन

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:to form SIT to properly investigate elgar parishad and Bhima Koregaon case says ncp chief sharad pawar