पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्या पुण्यातील १०६ जणांचा शोध लागला, उर्वरितांचा शोध वेगानं सुरु

निजामुद्दीन

दिल्लीतील निझामुद्दीन तबलिगी मर्कझ येथील धार्मिक कार्यक्रमात  सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये १०६ जणांचा शोध लागला आहे तर उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३६, सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ व कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त ७ व्यक्ती आहेत. १८२ पैकी १०६ जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७०, सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०६ जणांना ट्रेसिंग करुन त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

'दिल्लीतील तबलिगी समाजातील घटना म्हणजे तालिबानी स्वरुपाचा गुन्हा'

तबलिगी मर्कझमधील २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झालं. या परिसरातील  ३०० जणांना दिल्लीतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्या ७ जणांचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला होता. त्यातील ६ हे तेलंगणामधले होते तर १ जण काश्मीरमधला होता. तबलिगी मर्कझमध्ये ८ मार्च ते २१ मार्च या काळात धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी देशातूनच नाही जर जगभरातून लोक आले होते. जवळपास ३ हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

कोरोनाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणारी मराठमोळी व्यक्ती

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील ५१ जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील १८२ जणांचा  तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Till now 60 people from Pune have been put under quarantine in connection with Nizamuddin Markaz