पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिकटॉक व्हिडिओ केला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

संग्रहित छायाचित्र

पोलिसांना हवा असलेला एक आरोपी टिकटॉक व्हिडिओमुळे त्यांच्या जाळ्यात सापडला. आरोपीचा टिकटॉक व्हिडिओ बघून पोलिसांनी त्याला अटक केली. सोशल मीडियाचा पोलिसांना असाही फायदा झाल्याचे हे प्रकरण हटकेच म्हणावे लागेल.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक दाखले असून तो रहाटणी येथील रहिवासी आहे. ऍसिड हल्ल्याच्या आणि शारीरिक हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांना तो हवा होता. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. नव्याने प्रसारित झालेले मराठी गाणे 'वाढीव दिसतंय राव'वर दीपक नाचत असल्याचे पोलिसांनी व्हिडिओमध्ये बघितले. यश नावाच्या व्यक्तीने तो व्हिडिओ त्याच्या खात्यावरून सोशल मीडियावर टाकला होता. यश हा दीपकचा मित्र आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त ट्रेंडिंगमध्ये, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ बघितल्यावर लगेचच पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. काळेवाडीतील एका ह़ॉटेलबाहेर दीपक हातात शस्त्र घेऊन वेगवेगळ्या हालचाली करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. 

या संदर्भात वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने म्हणाले, आरोपीवर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करून इतरांवर चुकीचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न भविष्यात कोणी करू नये, यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे. आरोपीवर शस्त्रास्त्र कायद्यानुसारही गुन्हा दाखल केला आहे.