पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भोसरीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

गॅस सिलिंडर स्फोट (संग्रहित छायाचित्र)

भोसरीमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण भाजून जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरीतील सिद्धेश्वर शाळेजवळ असलेल्या एका इमारतीमध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

चिदंबरम यांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर

या घटनेत मनिषा साळुंके (३५), माऊली साळुंके (४०) आणि सिद्धार्थ साळुंके (१३) हे तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके कुटूंब सिद्धेश्वर शाळेजवळ एका छोट्या खोलीत राहते. मंगळवारी रात्री त्यांच्या घरातील गॅस शेगडीचे बटण सुरू राहिले होते. त्यामुळे रात्रभर त्यातून गॅस गळती झाली. बुधवारी सकाळी गॅस शेगडीवरील बर्नर सुरू करण्याच्यावेळीच अचानक स्फोट झाला. या घटनेत मनिषा आणि माऊली साळुंके यांना गंभीर भाजले आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा सुद्धा जखमी झाला आहे. या तिघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नक्की काय केलं वाचा...

स्फोटमुळे आग लागल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच कार्यवाही करीत आग आटोक्यात आणली. ज्या सिलिंडरचा स्फोट झाला तो सुद्धा लगेचच घरातून बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव शिंगाडे यांनी सांगितले.