पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एटीएममधून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात ८ लाखांची रोकड जळून खाक

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील पिंपरी आणि वाकडमध्ये रविवारी गॅस कटरनं एटीएम फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात रोकड जळून खाक झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. गणेशनगर परिसरातील उज्वला कॉम्पलेक्समध्ये  चोरांनी गॅटकरच्या साहाय्यानं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात आग लागून ७.९९ लाखांची रोकड जळून खाक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. सोमवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला.

विवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या

दुसरी घटना देखील रविवारी  रात्री वाकडमधील डांगे चौकात घडली. इथे देखील गॅस कटरच्या सहाय्यानं चोरांनी एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न केला.  यावेळी देखील आग लागून एटीएममधील रोकड जळाली. मात्र यात किती नुकसान झालं याचा आकडा समोर आलेला नाही. दरम्यान आग लागल्यानं चोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. 

‘सीएए’विरोधातील भूमिकेबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण