पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा, २० लाखांचे दागिने लंपास

नाकोडा ज्वेलर्स

पुण्यातील औंध परिसरातील परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्सवर आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास २ ते ३ जणांनी दरोड टाकला. चोरट्यांनी सुमारे २० लाखांचे दागिने लंपास केल्याचे सांगण्यात येते. 

त्याने तिघांचा खून केला... मृतदेह गाडीत भरले... आणि पोलिस ठाणे

परिहार चौक येथे नाकोडा ज्वेलर्स आहे. आज पहाटे २ ते ३ जणांनी दुकानाचे शटर व ग्रीलचा दरवाजा वाकवून आत प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही आहे. यात चोरीचा सर्व प्रकार कैद झाला आहे. परंतु, चोरट्यांनी मोठ्या शिताफीने आणि संपूर्ण चेहरा झाकला जाईल याची दक्षता घेत दुकानातील दागिने हातोहात लंपास केले. हे चोरटे कारमध्ये आले होते. चतुःश्रुंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी श्वान पथकही आणले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मान्सून परतला, पण उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज