पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : पुण्यातील गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत कैद्यांचे ढोल-ताशा पथक

गुरुजी तालीम मंडळ

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सोमवारी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. अशा पद्धतीने कैद्यांचे ढोल-ताशा पथक एखाद्या मिरवणुकीत सहभागी होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.

आले गणराय! उत्साहाच्या आणि मांगल्याच्या उत्सवाला सुरुवात!

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांचे ढोल-ताशा पथक या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या पथकातील कैद्यांनी पांढऱ्या रंगाचा झब्बा-कुर्ता घातला होता. या पथकाभोवती कारागृह पोलिसांकडून मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

या संदर्भात कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालकांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व कैदी खुल्या कारागृहातील आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कारागृहात ढोल-ताशाचा सराव करीत होते. या उपक्रमाबद्दल ते अत्यंत उत्साहित आहेत. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Team of 30 prisoners of Yerwada Central Jail play drums during procession of Guruji Talim Mandal in Pune