पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस अध्यक्षपदाच्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणतात, नो कमेंट्स!

सुशीलकुमार शिंदे

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात होती. पण याबद्दल काहीही बोलण्यास खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. मला या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. मंगळवारीच ते इंग्लंडहून भारतात परतले.

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील'

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात का, असे विचारल्यावर त्यांनी काहीही बोलायचे नसल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्याप पक्षाने नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. नवा अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसेल, एवढेच स्पष्ट करण्यात आलेले असले, तरी तो नक्की कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर

लोकसभा निवडणुकीनंतर २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना खुले पत्र लिहून अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर या पदासाठी शिंदे यांचे नाव चर्चेत आले होते.