पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्जमाफ कराः शरद पवार

शरद पवार

कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग ऊस पिकाचा आहे. पुरामुळे पिकांचे, फळांचे, शेतीच्या मातीचे, घरांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने पाणी ओसरताच त्वरीत नुकसानीचे पंचनामे करावेत अशी सूचना देत पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्ज माफ करावे, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली. पुणे येथे कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूरग्रस्तांना मदत करण्यास शासकीय यंत्रणा कमी पडल्याचा आरोपही त्यांनी केला. 

कोल्हापूर-सांगली महापूरः गरज भासल्यास एअर लिफ्टिंग करु- मुख्यमंत्री फडणवीस

शरद पवार पुढे म्हणाले की, पूर आलेला भाग हा ऊसाचा पट्टा आहे. सामान्यतः ऊसाच्या उंचीपर्यंत पाणी आले तर पिकाचे नुकसान होते. पिकाच्या खाली पाणी असेल तर अडचण नसते. उलट त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु, अनेक ठिकाणी पिकाच्या उंचीवर पाणी गेले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याबरोबर जमिनीवरची माती वाहून गेल्याचेही दिसत आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. गावातील पायाभूत सुविधांचेही तेवढेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पुरामुळे बांधलेली जनावरे सोडून दिली. दोन दिवसांत दुधाची मोठी आवक घटली आहे. 

आलमट्टीतून पाच लाख क्युसेक्सने विसर्ग, सांगलीतील पूर कमी होणार

त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर त्वरीत नुकसानीचे पंचनामे करावेत असा सल्ला दिला. पुराचा फटका बसलेल्या भागातील शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्ज माफ करण्याची राष्ट्रवादीची आग्रही मागणी असल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे सर्व लोकप्रतिनिधी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबतचा धनादेश सोमवारी सरकारला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकर घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत तसेच औषधे देण्याचे काम सुरुही केल्याचे ते म्हणाले.

साताऱ्यात पावसाचा जोर ओसरला; पूरस्थिती कायम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:state governments declare 100 percent loan waive for flood affected farmers of sangli kolhapur satara says ncp leader sharad pawar