पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेनेे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी दिले ५ कोटी

बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकने मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून तब्बल ५ कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषद २०-२० या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. 

या कार्यक्रमात फडणवीस यांनी कारखानदारांकडून मुख्यमंत्री मदतनिधी मिळाला नसल्याचे बोलून दाखवले. साखर उद्योग हा महाराष्ट्रच्या अर्थव्यवस्थेतेचा कणा आहे. या उद्योगाच्या पाठीशी राहण्याचे काम राज्य सहकारी बँकेने केले. साखर कारखानदार अडचणीत आल्यानंतर बँका अडचणीत येतात. त्यामुळे कारखानदारांनी खर्चामध्ये कपात करावी, असा सल्ला फडणवीसांनी दिला. राज्यातील आजारी कारखाने पुर्ववत सुरु करण्याच्या दृष्टिने राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, विद्याधर अनासकर तसेच राज्यातील साखर कारखानदार  उपस्थित होते.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:State Cooperative Bank handed over a cheque of Rs 5 crore to Chief Minister Devendra Fadnavis for CM Relief Fund