पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी PMPML कडून नवी शक्कल!

पीएमपीएमएल

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या PMPML बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी नवी युक्ती शोधण्यात आली आहे. महिन्याच्या प्रत्येक आठ तारखेला पीएमपीएमएलमधून महिलांना मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. सध्या तेजस्विनी या महिलांसाठी राखीव असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना ही सुविधा दिली जाते. ती आता पीएमपीएमएलच्या सर्वच गाड्यांसाठी लागू केली जाईल.

या संदर्भात पीएमपीएमएलचे सहअध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर म्हणाले, सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेऊ. यामध्ये महिन्यातून एक दिवस महिला प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेतले जाणार नाहीत. त्यांना पीएमपीएमएलच्या बसमधून मोफत प्रवास करू दिला जाईल. सध्या तेजस्विनी या खास महिलांसाठी राखीव बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिन्यातून एकदा ही सुविधा दिली जाते. पण आम्हाला ही सुविधा सर्वच बससाठी सुरू करायची आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्यात १३ प्रमुख ठिकाणी मोठे बदल

या नव्या उपक्रमाबद्दल महिला प्रवासी निधी जोशी म्हणाल्या, महिन्याच्या आठ तारखेला अनेक महिला तेजस्विनी बसमधून प्रवास करतात. यामुळे पीएमपीएमएल बसचा वापर करण्याची सवय महिलांना होईल आणि महिला प्रवाशांची संख्या वाढेल.

दरम्यान, पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये नव्याने ९४० गाड्या दाखल होत आहेत. २०१९ अखेरपर्यंत या गाड्या ताफ्यात येतील. या नव्या गाड्यांची पीएमपीएमएलला गरज होती. अनेक बसची अवस्था सध्या खराब आहे. अनेक गाड्या नादुरूस्त आहेत. नव्या बस दाखल झाल्यावर जुन्या गाड्या वापरातून काढून टाकल्या जातील, असे अजय चारठाणकर यांनी सांगितले.