पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात आंबेगावमध्ये भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

आंबेगावमध्ये भिंत कोसळली

पुण्यातील कोंढव्यामध्ये सुरक्षा भिंत कोसळून १५ जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आंबेगावमध्ये सिंहगड शिक्षण संस्थेची सुरक्षा भिंत कोसळून सोमवारी रात्री ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. पाच जण जखमी असून, त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंहगड महाविद्यालयाच्या आवारात आंबेगाव पोलिस ठाण्याजवळ ही घटना घडली.

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या ठिकाणीही मजुरांच्या झोपड्यांवर भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२ ते १ च्या दरम्यान ही घटना घडली. घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. रात्री १ वाजून १५ मिनिटांनी एनडीआरएफला या घटनेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

मृतांची नावे

राधेलाल पटेल(वय २५)
जेटू लाल पटेल (वय ५०)
ममता राधेलाल पटेल (वय २२)
जितू चंदन रवते (वय २४)
जेटूलाल पटेल( वय ४५)
ममता पटेल ( वय २४) 

गेल्या शनिवारीच कोंढव्यात अल्कन स्टायलस सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्याला ७२ तास होण्याच्या आतच पुण्यात ही दुसरी घटना घडली आहे. मृत पावलेले सर्व जण मुळचे छत्तीसगढचे आहेत. ते मजुरीच्या कामासाठी पुण्यात आले होते. सुरक्षा भिंतीजवळ झोपड्यांमध्ये ते राहात होते. सोमवारी रात्री ही भिंतच त्यांच्या झोपड्यांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली.