पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वयाच्या ९८ व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरेंचा संघाच्या संचलनात सहभाग

बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभाग नोंदवला. पुणे शहरात दरवर्षी दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलनाचे आयोजन केले जाते. त्यात बाबासाहेब पुरंदरे हे सहभागी झाले होते.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

बाबासाहेब पुरंदरे हे दरवर्षी पथ संचलनात सहभागी होतात. लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन झाले. यावेळी मोठ्यासंख्येने संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे हे संघाच्या पोषाखात सहभागी झाले होते.

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल

दरम्यान, राज्यातील विविध भागात संघाचे पथसंचलन झाले. यंदा विधानसभा निवडणूक असल्यामुळे अनेक उमेदवारही पथसंचलनात सहभागी झाले होते. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत दाखल झालेले काही उमेदवार हे संघाच्या पथसंचलनात सहभागी झाल्याचे दिसले. तर काहींनी पथसंचलनावर पुष्पवृष्टीही केली. सोलापूर मध्यमधून शिवसेनेकडून निवडणुकीला उभे असलेले दिलीप माने यांनी पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली. माने हे काँग्रेसचे नेते आणि आमदारही होते.

'सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने ओबीसींसाठी खूप कामं