पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

निर्मलाताई पुरंदरे

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी चार दशके काम केलेल्या 'वनस्थळी' संस्थेच्या संस्थापिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई बळवंत पुरंदरे यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. 

त्यांच्यामागे पती, दोन मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.