पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसैनिकांनी पुण्यात पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले

विमा कंपनीचे कार्यालय फोडले

पुण्यामध्ये शिवसैनकांनी इफको टोकियो या पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. पीक विमा वाटप न करत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी या कंपनीविरोधात आंदोलन केले. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयामध्ये घूसून शिवसैनिकांनी तोडफोड केली. कंपनीचे काचेचे दरवाजे, खुर्च्या, कम्प्युटर यांची तोडफोड करण्यात आली आहे. 

आमच्याकडे आकडे नाहीत, कौल महायुतीच्या बाजूनेच - शरद पवार

पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी कोरेगाव पार्कमध्ये असलेली विमा कंपनीकडे शेतकरी वारंवार अर्ज करत होते. मात्र कंपनी पीक विम्याची रक्कम देत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शहरप्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केले. शिवसैनिकांनी थेट या कंपनी तोडफोड केली. दरम्यान, जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाही तर राज्यभर शिवसेनेच्या वतीने असेच तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

दिल्लीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरद पवार म्हणाले...