पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...तरीही शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारच!'

शिवनेरीवरील शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी शिवनेरी किल्ल्यावर राज्य सरकारच्यावतीने शिव जयंती साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारमधील अन्य नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.  शिवसेनेचा तारेखनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याला कायम विरोध राहिला आहे. हिंदू कँलेंडरनुसार मार्चमध्ये शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते.

'हाऊडी मोदी' प्रमाणे 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाची लगबग!

तारखेनुसार झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थितीत असले तरी यावर्षी देखील शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. शिवसेनेचे शिरुर मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील शिवजंयतीच्या त्यांच्यासह आम्हीही (शिवसेनेचे नेते) उपस्थितीत होतो. या कार्यक्रमाला उपस्थिती असलो तरी यंदाच्या वर्षीही शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. १२ मार्चला शिवसेनेच्यावतीने उत्साहात शिवजयंती  साजरी केली जाईल, असे आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.  

मी 'ते' वक्तव्य केलेच नाही; इंदोरीकर महाराजांचा दावा

१९९५ मध्ये  सेना-भाजपच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवजयंतीच्या तारखेचा वाद मिटवण्यासाठी इतिहासकार आणि अभ्यासकांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने १९ फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असा अहवाल सादर केला होता. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय लागू केला होता.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena will celebrate Shiv Jayanti this year on the tithi day as per the Hindu calendar on March 12