पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी खासदारांसह एकविरा देवीच्या दर्शनाला

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी खासदारांसह एकविरा देवाच्या दर्शनाला

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांना घेऊन शनिवारी लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटंबातील रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते, 

एकविरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदैवता आहे. ठाकरे कुटुंबीय वारंवार येथे दर्शनाला येत असतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांसह एकविरा देवीचे मंदिर गाठले. यावेळी सर्व खासदार पायथ्यापासून मंदिरापर्यंत चालत गेले. 

शिवसेनेला पुन्हा अवजड उद्योग खाते दिल्यावरून उद्धव ठाकरे नाराज

यावेळी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, खासदार भावना गवळी, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, राजन विचारे, श्रीकांत शिंदे यांच्यासह १८ खासदारांनी सपत्नीक उपस्थित दर्शवत आई एकविरा देवीचे आशीर्वाद घेतले.