पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊत यांच्या प्रश्नांचा शरद पवार करणार 'सामना'

शरद पवार आणि संजय राऊत

शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत हे येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ही प्रकट मुलाखत पुणे येथे होणार आहे. संजय राऊत यांनी टि्वट करुन याची माहिती दिली. 

राऊत आणि पवार यांच्या निकटचे संबंध आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यात राऊत आणि पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. सत्ता स्थापन करण्याआधी राऊत-पवार यांच्यात वारंवार बैठका व्हायच्या.

 

भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला

त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या या प्रकट मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत कोणते प्रश्न विचारणा आणि त्याला शरद पवार हे कसे उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या मुलाखतीतून अनेक गुपिते उलगडली जाण्याची शक्यता आहे.

..तर परवेझ मुशर्रफ यांनाही नागरिकत्व मिळावं: सुब्रमण्यम

गतवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गेल्या शरद पवार यांची पुण्यातच जाहीर मुलाखत घेतली होती. ही मुलाखत चांगलीच गाजली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena leader mp sanjay raut will take open interview of ncp chief sharad pawar in pune