पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात शिवभोजन थाळी सुरु

अजित पवार शिवभोजन थाळीच्या शुभारंभप्रसंगी

महाराष्ट् विकास आघाडीच्या विशेषतः शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला आज प्रजासत्ताक दिनी सुरुवात करण्यात आली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सचिनचा गोलंदाजीतील हा विक्रम तुम्हाला माहितेय का?

पुणे महानगरपालिका भवनाच्या निशिगंध हॉटेलमध्ये 'शिवभोजन' योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेचा लाभ अधिकाधिक गोरगरीब आणि गरजू लोकांना मिळेल, असा विश्वास आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १,३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ देण्यात येणार आहे. या थाळीचे शहरात आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर ठेवण्यात आले आहेत. 

चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक

मुंबई उपनगरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या उपहारात ही १० रुपयांत मिळणाऱ्या थाळीचे उद्घाटन करण्यात आले.