पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पवार साहेब चमत्कारी असल्याचे सांगत CM ठाकरेंचा भाजपला टोला

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

पवार साहेबांनी राजकारणात कमीत कमी जागेत सत्ता परिवर्तन करण्याचा चमत्कार करुन दाखवला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचावर भाष्य केले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव  ठाकरे बोलत होते.  या संस्थेच्या प्रमुखपदी असलेले पवार साहेब शेतकऱ्यांना कमी जागेत अधिकाधिक उत्पादन कसे घ्यायचे याचे मार्गदर्शन करत असतात. असाच काहीसा पराक्रम त्यांनी राजकारणात करुन दाखवल्याचे त्यांनी म्हटले आहे.  त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी, सहकार, साखर कारखानदारी आणि सत्तेच्या राजकारणावर भाष्य केले.    

सचिनच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

विधानसभा निवडणुकीनंतरच्या राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कमीत कमी आमदारांमध्ये चमत्कार घडू शकतो ते पवार साहेबांनी महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये दाखवून दिले. त्यामुळे जागा जास्त आहेत आमचंच सगळ पिक येणार असं कुणी म्हणू नये. त्यांच्या बोलण्याचा रोख हा राज्यात सर्वाधिक जागा मिळवून सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपकडे होता. या शब्दातून नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोलाच लगावला आहे. ठाकरे पुढे म्हणाले की,  शेतकरी कमीत कमी जागेत अधिक उत्पादन घेतो. त्याप्रमाणे शरद पवार यांच्यामुळे कमी आमदारात आमचे सरकार सत्तेत आले. एक ऊस असेल तर तो मोडता येतो. पण, ऊसाची मोळी असेल तरी मोडता येत नाही. त्याप्रमाणे हे सरकार देखील मोळीसारखे भक्कम असेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादन व साखर कारखान्यांच्या सरकार योग्य तो न्याय देईल, असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.  

सिंचन घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चीटवर शंकेचे नवे ढग

 महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारच्यावतीने तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात राज्य सरकार तातडीने निर्णय घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकार मंत्री तथा अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, इंडियन शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, कलप्पा आवाडे, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.