पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगाव प्रकरण : शरद पवारांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले

शरद पवार

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना येत्या ४ एप्रिलला दोन सदस्यीय आयोगापुढे साक्ष नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासह पुण्याचे माजी पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक आणि माजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनाही साक्ष नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले आहे. एकूण पाच जणांना आयोगाने पाचारण केले आहे.

कोरोना विषाणू प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन

एक जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यामागे नक्की कोणती कारणे होती, याचा शोध घेण्यासाठी दोन सदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने माजी मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सध्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.

आयोगाकडून बुधवारी साक्ष नोंदविण्यासाठी कोणाला कधी बोलावण्यात आले आहे, याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकामध्ये कोणत्याही स्थितीत बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोरोना : ... तर इंग्लंडमध्ये पाच लाख आणि अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी

आयोगाने पुण्याचे माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर आणि राजेंद्र गायकवाड यांनाही पाचारण केले आहे. राजेंद्र गायकवाड हे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज आहेत.