पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RSS च्या कार्यकर्त्यांसारखे प्रचार करायला शिका : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. स्वयंसेवक ज्याप्रमाणे जनसंपर्क साधतात त्याप्रमाणे चिकाटी असायला हवी, असे ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. जर स्वयंसेवक ५  घरांमध्ये प्रचार करण्यासाठी गेले आणि त्यातील एक घर बंद असेल तर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या घरात जातात, असे उदाहरणही यावेळी पवारांनी दिले. 

गडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची 

जोपर्यंत ते घरातील व्यक्तींशी संपर्क करत नाहीत तोपर्यंत ते आपले काम करत राहतात. त्यांचे काही मुद्दे आपल्याला पटत नसले तरी त्यांचातील ही गोष्ट आपल्याला शिकायला हवी, असा सल्ला पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकाने आपण कोणत्या भागात काम करायचे आहे हे समजून घेत नागरिकांशी संपर्क साधावा. त्यांच्या भेटी घेऊन परिसरातील आढावा घ्यावा. आतापासून हे काम हाती घेतल्यास निवडणुकीच्या काळात आपल्याला त्यांची आठवण येते, असे मतदारांना वाटत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

 पवारांनी अनेकदा संघावर टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांच्या जनसंपर्क आणि प्रचार तंत्राचा दाखला देत त्यांनी विरोधकाच्या चांगल्या गुणांचा अवलंब करायला हरकत नाही, असा संदेशच त्यांनी  कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:see how RSS members campaign How to stay in touch with the people NCP chief Sharad Pawar advice of party workers in pune