पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोबाइलचा अतिवापर करण्यापासून रोखल्यानं अल्पवयीन मुलीचा मुंबईहून पुण्यात पळ

प्रातिनिधिक छायाचित्र

पालकांनी मोबाइलचा अतिवापर करण्यापासून मज्जाव केल्यानं मुंबईतील अल्पवयीन मुलगी  पुण्यात पळून गेली. पुणे पोलिसांच्या दक्षतेमुळे या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. 

पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा, २० लाखांचे दागिने लंपास

'बुधवारी दुपारी या मुलीला पुण्यातील शिवाजीनगर भागात महिला कॉन्स्टेबलनं हटकलं. ही मुलगी बस स्टॉपवर संभ्रमावस्थेत बसून होती. ज्यावेळी महिला  कॉन्स्टेबलनं चौकशी केली तेव्हा ती घरातून कोणालाही न सांगता पळून आल्याचं  कबुल केलं. आम्ही तिला पोलिस स्थानकात आणलं. तिनं कुटुंबीयांचा मोबाईल नंबर दिल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला', अशी माहिती शिवाजीनगर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब कोपनार यांनी दिली. 

मुंबईत आठवड्या अखेरीस मान्सूनोत्तर सरी

'ही मुलगी दहावीत नपास झाली होती. तेव्हापासून ती घरीच होती. अभ्यासात कमी आणि मोबाइलमध्ये जास्त लक्ष असल्यानं तिचे पालक सतत ओरडायचे. तिच्या भविष्याची त्यांना चिंता होती. मोबाइल वापरण्यापासून तिला मज्जाव केला जायचा या रागातून तिनं घर सोडलं', अशी माहिती पोलिसांनी दिली. संबधित मुलीची समजूत घालून तिला आता पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.