पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे: अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुण्यामध्ये अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत शाळेच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग, पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

पुण्याच्या कोरेगाव पार्क येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर २५ वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीच्या शाळेबाहेर हा तरुण नेहमी उभा राहायचा. तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकेल आणि तुझ्या कुटुंबियांना मारुन टाकेल, अशी धमकी आरोपी तिला देत होता. 

चकमकीत २ कोब्रा कमांडो शहीद, एका नक्षलवाद्याचाही खात्मा

एक दिवस आरोपी विद्यार्थिनीला जबरदस्ती गाडीवर बसवून घेऊन गेला. वाघोली परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी देत होता. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती पीडितेने आईला सांगितली. हे ऐकताच तिच्या आईला धक्का बसला. त्यांनी याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.  

... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास