पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर

शाळेतील विद्यार्थी (संग्रहित छायाचित्र)

पुणे जिल्ह्यात गेल्या शनिवारपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग आणि मंगळवारीही पाऊस असाच सुरू राहणार असल्याची शक्यता विचारात घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांसाठी हे आदेश लागू आहेत.

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

पुण्यातील पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुंडूब भरली आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही धरणे पू्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या प्रमाणेच भीमा आणि नीरा खोऱ्यातील अन्य धरणेही भरल्यामुळे तेथून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील शाळांना मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पावसामुळे पुण्यातील शाळांना सोमवारीही सुटी जाहीर करण्यात आली होती.