पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ११ डिसेंबरपासून, दिग्गज कलाकारांचा सहभाग

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (संग्रहित छायाचित्र)

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यंदा ११ ते १५ डिसेंबर २०१९ या काळात पुण्यातील मुकुंदनगर भागातील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची सविस्तर माहिती दिली.

शरद पवारांच्या दिल्लीतील 'त्या' वक्तव्यामागे दडलेल्या ५ शक्यता

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात २९ कलाकार कला सादर करणार आहेत. यात देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आणि परदेशी कलाकाराचा समावेश असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

महोत्सवाची वेळ पहिले तीन दिवस म्हणजेच ११ ते १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० अशी तर चौथ्या दिवशी म्हणजेच १४ रोजी दुपारी ४ ते रात्री १२ अशी असेल. शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी १५ डिसेंबर रोजी महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री १० अशी असणार आहे. 

स्मृती इराणी... इन्स्टाग्राम पोस्ट... आणि लक्षवेधक कॅप्शन

सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, संगीतमार्तंड पं. जसराज, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे – देशपांडे, जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम, प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार, पं. उपेंद्र भट हे दिग्गज कलाकार यावेळी महोत्सवात आपली कला सादर करतील. 
परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.